Lokmat Money > बिझनेस न्यूज > सलग तिसऱ्या सत्रात सोने घसरले

सलग तिसऱ्या सत्रात सोने घसरले

ज्वेलरांनी खरेदीत आखडता हात घेतल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोने ६0 रुपयांनी घसरून ३१,0५0 रुपये तोळा झाले.

By admin | Updated: September 1, 2016 04:41 IST2016-09-01T04:41:44+5:302016-09-01T04:41:44+5:30

ज्वेलरांनी खरेदीत आखडता हात घेतल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोने ६0 रुपयांनी घसरून ३१,0५0 रुपये तोळा झाले.

Gold slipped for the third straight session | सलग तिसऱ्या सत्रात सोने घसरले

सलग तिसऱ्या सत्रात सोने घसरले

नवी दिल्ली : ज्वेलरांनी खरेदीत आखडता हात घेतल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोने ६0 रुपयांनी घसरून ३१,0५0 रुपये तोळा झाले. सोन्याच्या भावातील ही सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रातील घसरण ठरली आहे. चांदीचा भाव मात्र, ४४,८00 रुपये किलो, असा स्थिर राहिला.
जागतिक बाजारातही सोने घसरले. न्यूयॉर्क येथे सोने 0.९६ टक्क्याने घसरून १,३१0.५0 डॉलर प्रति औंस झाले. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ६0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३१,0५0 रुपये आणि ३0,९00 रुपये प्रति १0 गॅ्रम झाला. गेल्या दोन सत्रांत सोने १४0 रुपयांनी घसरले आहे. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,३00 रुपये असा स्थिर राहिला.
दिल्लीत तयार चांदी ४४,८00 रुपये किलोवर स्थिर राहिली असताना, साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी मात्र, ५ रुपयांनी
घसरून ४४,१२५ रुपये किलो
झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold slipped for the third straight session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.