Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्यात तेजी, चांदी घसरली

सोन्यात तेजी, चांदी घसरली

आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्याने सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात १२० रुपयांची वाढ झाली, तर चांदी २५० रुपयांनी घसरली.

By admin | Updated: April 19, 2016 03:02 IST2016-04-19T03:02:19+5:302016-04-19T03:02:19+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्याने सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात १२० रुपयांची वाढ झाली, तर चांदी २५० रुपयांनी घसरली.

Gold slid, silver down | सोन्यात तेजी, चांदी घसरली

सोन्यात तेजी, चांदी घसरली

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ झाल्याने सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात १२० रुपयांची वाढ झाली, तर चांदी २५० रुपयांनी घसरली.
सोन्याचा दर सोमवारी प्रति दहा ग्रॅमसाठी २९,५५० रुपये होते, तर चांदीचे दर २५० रुपयांनी घसरून ३८,४५० रुपये प्रतिकिलो असे होते. लंडन आणि न्यूयॉर्कमधील माहितीनुसार सोने स्टँडर्ड १.६० डॉलरने वाढून १२३५.५० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार कच्च्या तेलाच्या प्रमुख देशांमध्ये उत्पादन स्थिर करण्याबाबत सहमती झाली नाही. यानंतर जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या वाढत्या किमतीकडे पाहिले जात आहे. अर्थात अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्याचे संकेत मिळत असताना सोन्याच्या बाजारपेठेवर याचा दबाव आहे.

Web Title: Gold slid, silver down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.