नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत तेजी आणि लग्नसराईसाठी सुरू झालेली खरेदी या बळावर सोन्या-चांदीच्या भावांत गुरुवारी वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोने ८0 रुपयांनी वाढून २५,८२0 रुपये तोळा झाले. चांदी २५0 रुपयांनी वाढून ३४,४00 रुपये किलो झाली.
सराफा बाजारात ज्वेलर्स तसेच रिटेलर्स अशा दोघांनीही खरेदी केल्याचे दिसून आले. त्याचा लाभ सोन्याला झाला. औद्योगिक क्षेत्रातून तसेच शिक्के निर्मात्यांकडून झालेल्या खरेदीचा लाभ चांदीला झाला.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील तेजीला लग्नसराईच्या खरेदीची जोड मिळाल्याने दोन्ही मौल्यवान धातू तेजीत आले आहेत. आशियाई बाजारांपैकी एक प्रमुख बाजार असलेल्या सिंगापुरात सोने वाढून १,0७१.५0 डॉलर प्रतिऔंस झाले.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रत्येकी ८0 रुपयांनी वाढून २५,८२0 रुपये आणि २५,६७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. तत्पूर्वी, काल गुरुनानक जयंती निमित्ताने दिल्लीचा सराफा बाजार बंद होता. ८ ग्रॅम सोन्या गिन्नीचा भाव मात्र २२,२00 रुपयांवर स्थिर राहिला. मर्यादित व्यवहार झाल्यामुळे गिन्नीचा भाव वाढू शकला नाही.
चांदीही सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालताना दिसून आली. तयार चांदीचा भाव २५0 रुपयांनी ३४,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ३९५ रुपयांनी वाढून ३४,0३0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ४८ हजार रुपये आणि विक्रीसाठी ४९ हजार रुपये प्रति शेकडा असा आदल्या सत्राच्या पातळीवर कायम राहिला. (वृत्तसंस्था)
जागतिक तेजीने वाढला सोने, चांदीचा भाव...!
जागतिक बाजारातील मजबूत तेजी आणि लग्नसराईसाठी सुरू झालेली खरेदी या बळावर सोन्या-चांदीच्या भावांत गुरुवारी वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोने ८0 रुपयांनी वाढून २५,८२0 रुपये तोळा झाले.
By admin | Updated: November 27, 2015 00:10 IST2015-11-27T00:10:02+5:302015-11-27T00:10:02+5:30
जागतिक बाजारातील मजबूत तेजी आणि लग्नसराईसाठी सुरू झालेली खरेदी या बळावर सोन्या-चांदीच्या भावांत गुरुवारी वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोने ८0 रुपयांनी वाढून २५,८२0 रुपये तोळा झाले.
