Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने सात आठवड्यांच्या उच्चांकावर, चांदीही तेजीत

सोने सात आठवड्यांच्या उच्चांकावर, चांदीही तेजीत

लग्नसराईच्या खरेदीने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी तेजी परतली. सोन्याचा भाव ३०५ रुपयांनी उंचावून २७,३५५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

By admin | Updated: April 28, 2015 23:46 IST2015-04-28T23:46:36+5:302015-04-28T23:46:36+5:30

लग्नसराईच्या खरेदीने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी तेजी परतली. सोन्याचा भाव ३०५ रुपयांनी उंचावून २७,३५५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Gold, silver extend gains on the seven-week high | सोने सात आठवड्यांच्या उच्चांकावर, चांदीही तेजीत

सोने सात आठवड्यांच्या उच्चांकावर, चांदीही तेजीत

नवी दिल्ली : लग्नसराईच्या खरेदीने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी तेजी परतली. सोन्याचा भाव ३०५ रुपयांनी उंचावून २७,३५५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. हा गेल्या सात आठवड्यांचा उच्चांक आहे.
औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांच्या खरेदीने चांदीचा भाव १,००० रुपयांनी वधारून ३७,५०० रुपये प्रतिकिलो झाला.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने पाच आठवड्यांचा उच्चांक गाठला. परिणामी, स्थानिक सराफ्यात तेजीचा कल नोंदली गेला आहे. स्थानिक सराफ्यात व्यापाऱ्यांनी लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी खरेदी केल्याने ही तेजी राहिली.
न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव १.८० टक्क्यांनी उंचावून १,२०१.७० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ४.०९ टक्क्यांनी वधारून १६.४० डॉलर प्रतिऔंस झाला.
तयार चांदीचा भाव १,००० रुपयांनी उंचावून ३७,५०० रुपये आणि साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ८७५ रुपयांनी वधारून ३७,०५५ रुपये प्रति किलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वाढून खरेदीसाठी ५६,००० रुपये आणि विक्रीसाठी ५७,००० रुपये
प्रति शेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

४राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३०५ रुपयांनी उंचावून अनुक्रमे २७,३५५ रुपये आणि २७,२०५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या २ मार्च रोजी सोन्याचा भाव या पातळीवर होता. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला.

Web Title: Gold, silver extend gains on the seven-week high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.