Lokmat Money > बिझनेस न्यूज > राजधानी दिल्लीत सोने-चांदी वधारले

राजधानी दिल्लीत सोने-चांदी वधारले

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि दागदागिने तयार करणाऱ्यांसह किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीमुळे राजधानी दिल्ली सराफा

By admin | Updated: March 12, 2015 00:19 IST2015-03-12T00:19:48+5:302015-03-12T00:19:48+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि दागदागिने तयार करणाऱ्यांसह किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीमुळे राजधानी दिल्ली सराफा

Gold, silver extend gains on capital inflows | राजधानी दिल्लीत सोने-चांदी वधारले

राजधानी दिल्लीत सोने-चांदी वधारले

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि दागदागिने तयार करणाऱ्यांसह किरकोळ व्यापाऱ्यांनी केलेल्या खरेदीमुळे राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २० रुपयांनी वधारला, तसेच चांदीचा भावही प्रति किलो १०० रुपयांनी झळाळला.
राजधानी सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव २० रुपयांनी वधारत २६,४५० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम), तर चांदीचा भाव १०० रुपयांनी झळाळत ३६,१०० रुपयांवर (प्रति किलो) गेला. औद्योगिक क्षेत्रासोबत नाणे पाडणाऱ्या व्यापाऱ्यांकडून बऱ्यापैकी खरेदी झाल्याने चांदी चमकली. सिंगापूर सराफा बाजारातील घडामोडीनुसार भारतीय सराफा बाजारातील चढ-उतार निश्चित होत असतो. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस १,१६५.३३ डॉलर, तर चांदीचा भाव प्रति औंस १५.७३ डॉलर होता.
मुंबई सराफा बाजारात मात्र सोन्याच्या भाव २६ हजाराखाली आला. शुद्ध सोन्याचा भाव १०५ रुपयांनी कमी होत दिवसअखेर २६,०७५ रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) आला. चांदीचा भावही १२५ रुपयांनी घसरत ३६,३७० रुपयांवर (प्रति किलो) आला.

Web Title: Gold, silver extend gains on capital inflows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.