नवी दिल्ली : घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करून त्यावर करमुक्त व्याजाच्या स्वरूपात कमाई करण्याची योजना लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावित योजनेसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ टिपण जारी करण्यात आले असून काही आठवड्यांत या योजनेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या योजनेसाठी व्याजदरासह इतर प्रस्तावांवर विचार केला जात आहे.
भारतीयांजवळ जवळपास २० हजार टन सोने वापराविना पडून आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ६० लाख कोटी रुपये होते. सोन्याच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक असून दरवर्षी ८०० ते १ हजार टन सोने आयात केले जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुवर्ण बचत योजना सुरू होणार लवकरच
घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करून त्यावर करमुक्त व्याजाच्या स्वरूपात कमाई करण्याची योजना लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे
By admin | Updated: July 22, 2015 23:38 IST2015-07-22T23:38:01+5:302015-07-22T23:38:01+5:30
घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करून त्यावर करमुक्त व्याजाच्या स्वरूपात कमाई करण्याची योजना लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे
