नवी दिल्ली : शुक्रवारी सराफा बाजारात संमिश्र कल दिसून आला. राजधानी दिल्लीत सोने १0 रुपयांनी वाढून २५,१00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव मात्र ५0 रुपयांनी घसरून ३४,000 रुपये किलो झाला.
जागतिक बाजारात मात्र घसरणीचाच कल दिसून आला. सिंगापूर येथील सोने बाजारात सोन्याचा भाव 0.५ टक्क्यांनी घसरून १,0८३.१८ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.५ टक्क्यांनी वाढून १४.६७ डॉलर प्रति औंस झाला.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १0 ग्रॅमने वाढून अनुक्रमे २५,१00 रुपये आणि २४,९५0 रुपये तोळा झाला. गेल्या तीन दिवसांत सोने ४00 रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या ८ ग्रॅम गिन्नीचा भाव मात्र २२,२00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव ५0 रुपयांनी घसरून ३४,000 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र ३५ रुपयांनी वाढून ३३,८१५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ४८ हजार रुपये आणि विक्रीसाठी ४९ हजार रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला.
सोने १0 रुपयांनी वाढले
शुक्रवारी सराफा बाजारात संमिश्र कल दिसून आला. राजधानी दिल्लीत सोने १0 रुपयांनी वाढून २५,१00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव मात्र ५0 रुपयांनी घसरून
By admin | Updated: August 1, 2015 02:01 IST2015-08-01T02:01:01+5:302015-08-01T02:01:01+5:30
शुक्रवारी सराफा बाजारात संमिश्र कल दिसून आला. राजधानी दिल्लीत सोने १0 रुपयांनी वाढून २५,१00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीचा भाव मात्र ५0 रुपयांनी घसरून
