Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने ७०, तर चांदी ५0 रुपयांनी वधारली

सोने ७०, तर चांदी ५0 रुपयांनी वधारली

जागतिक बाजारातील उत्साह आणि सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोन्याचा भाव सोमवारी दहा ग्रॅ्रममागे ७० रुपयांनी वधारला.

By admin | Updated: December 22, 2015 02:42 IST2015-12-22T02:42:40+5:302015-12-22T02:42:40+5:30

जागतिक बाजारातील उत्साह आणि सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोन्याचा भाव सोमवारी दहा ग्रॅ्रममागे ७० रुपयांनी वधारला.

Gold rose 70 and silver by 50 rupees | सोने ७०, तर चांदी ५0 रुपयांनी वधारली

सोने ७०, तर चांदी ५0 रुपयांनी वधारली

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील उत्साह आणि सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोन्याचा भाव सोमवारी दहा ग्रॅ्रममागे ७० रुपयांनी वधारला. चांदीही किलोमागे ५० रुपयांनी महाग झाली. या उत्साहानंतर सोने २५,६०० तर चांदी ३३,८५० रुपये झाली.
जागतिक बाजारात सोन्याला चांगली मागणी असल्यामुळे गुंतवणूकदारांची त्याला पसंती होती ती अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेरडरल रिझर्व्ह व्याजदरात हळूहळू वाढ करील या विचाराने. सिंगापूरच्या बाजारात सोन्याचा भाव ०.४ टक्के वाढून औंसमागे १,०७०.३६ अमेरिकन डॉलर झाला. शिवाय सराफांकडून वाढलेली खरेदी आणि कमकुवत झालेल्या डॉलरमुळेही सोने काहीसे वधारले, असे सराफांनी सांगितले.
आठ ग्रॅमच्या सोन्याचा भाव विस्कळीत व्यवहारात २२,२०० रुपये असा स्थिर राहिला. तयार चांदी किलोमागे ५० रुपयांनी वाढून ३३,८५० रुपये व वीकली बेसड् डिलिव्हरीची चांदी १० रुपयांनी वाढून ३३,९४५ रुपये झाली. चांदीच्या १०० नाण्यांचा भाव खरेदीसाठी ४७,००० तर विक्रीसाठी ४८,००० रुपये असा पूर्वीचाच राहिला.

Web Title: Gold rose 70 and silver by 50 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.