Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणुकीसाठी सोन्यालाच प्राधान्य

गुंतवणुकीसाठी सोन्यालाच प्राधान्य

गुंतवणुकीची आणि भरभक्कम परताव्याची अनेक आकर्षक साधने बाजारात उपलब्ध झाली असली तरी, आजही सोन्यामधील गुंतवणुकीलाच भारतीयांची सर्वाधिक पसंती असल्याची माहिती पुढे आली आहे

By admin | Updated: July 31, 2014 03:19 IST2014-07-31T03:19:16+5:302014-07-31T03:19:16+5:30

गुंतवणुकीची आणि भरभक्कम परताव्याची अनेक आकर्षक साधने बाजारात उपलब्ध झाली असली तरी, आजही सोन्यामधील गुंतवणुकीलाच भारतीयांची सर्वाधिक पसंती असल्याची माहिती पुढे आली आहे

Gold priority for investment | गुंतवणुकीसाठी सोन्यालाच प्राधान्य

गुंतवणुकीसाठी सोन्यालाच प्राधान्य

मनोज गडनीस, मुंबई
गुंतवणुकीची आणि भरभक्कम परताव्याची अनेक आकर्षक साधने बाजारात उपलब्ध झाली असली तरी, आजही सोन्यामधील गुंतवणुकीलाच भारतीयांची सर्वाधिक पसंती असल्याची माहिती पुढे आली आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅफिसने (एनएसएसओ) ग्रामीण आणि शहरी भागांतील गुंतवणुकीचा पॅटर्न अभ्यासण्यासाठी केलेल्या ‘हाऊसहोल्ड कंझम्शन आॅफ व्हेरियस गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिसेस इन इंडिया’ या अहवालाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
भारतातील गुंतवणुकीला पॅटर्न तपासण्यासाठी एनएसएसओतर्फे नियमित टप्प्यांनी अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. संस्थेने या संदर्भातील ६८ वा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. २०११-१२ वर्षामध्ये झालेल्या सर्वेक्षणाचा तपशील संस्थेने नुकताच जाहीर केला असून, २००४-२००५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत सरत्या आठ वर्षांत गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी सोन्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. किंबहुना, एकूण गुंतवणुकीत सोन्याच्याच गुंतवणुकीत वाढ झाली आहे.
या अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतून स्वतंत्रपणे गुंतवणुकीचा पॅटर्न तपासला गेला आहे.
२००४-०५ या वर्षी ग्रामीण भागांतून एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षाकाठी जी गुंतवणूक केली त्यापैकी १३.८ टक्के एकरकमी गुंतवणूक ही सोन्यामध्ये केल्याचे दिसून आले तर, २०११-१२ या वर्षांत एकूण गुंतवणुकीपैकी सोन्यातील एकरकमी गुंतवणुकीच्या प्रमाणात घसघशीत वाढ होत हे प्रमाण २३.६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
ग्रामीण भागाच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी काहीसे जास्त पर्याय उपलब्ध असूनही शहरी भागांतूनही सोन्याच्या गुंतवणुकीकडेच झुकता कल दिसून आला आहे. २००४-०५ मध्ये १९.२ टक्क्यांवर असलेले प्रमाण २३.२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्टाच्या योजना किंवा निश्चित परतावा देणाऱ्या योजनांचे व्याजदर कमी झाल्यामुळे आणि दुसरीकडे शेअर बाजारातही नैराशाचे वातावरण कायम राहिल्याने या दोन्ही गुंतवणूक साधनांकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

Web Title: Gold priority for investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.