Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या नीचांकावर; चांदी मात्र तेजीत

सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या नीचांकावर; चांदी मात्र तेजीत

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदली गेली.

By admin | Updated: May 29, 2015 23:59 IST2015-05-29T23:59:22+5:302015-05-29T23:59:22+5:30

जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदली गेली.

Gold prices up at three-week low; Silver only increased | सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या नीचांकावर; चांदी मात्र तेजीत

सोन्याचा भाव तीन आठवड्यांच्या नीचांकावर; चांदी मात्र तेजीत

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सलग चौथ्या दिवशी घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव ५० रुपयांच्या घसरणीसह २७,२७५ रुपये तोळा झाला. ही सोन्याची तीन आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. तथापि, चांदीचा भाव २१० रुपयांच्या सुधारणेसह ३८,७५० रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मागणीत सातत्याने घट होत आहे. जागतिक बाजारातही घसरणीचा कल होता. याचा बाजार धारणेवर नकारात्मक परिणाम झाला.
जागतिक बाजारात न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव घसरणीसह १,१८७.८० डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,२७५ रुपये व २७,१२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. गेल्या आठ मेनंतरची ही नीचांकी पातळी आहे. गेल्या तीन सत्रांत सोन्याच्या भावामध्ये १५० रुपयांची घट झाली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव २१० रुपयांनी वधारून ३८,७५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ८० रुपयांनी वाढून ३८,३७५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव कोणत्याही बदलाशिवाय खरेदीसाठी ५६,००० रुपये आणि विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला.

Web Title: Gold prices up at three-week low; Silver only increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.