नवी दिल्ली : आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मर्यादित खरेदीमुळे सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २७,८०० रुपये तोळा असा कायम राहिला. दुसरीकडे चांदीच्या भावाने ३५० रुपयांच्या वाढीसह ४० हजार रुपये किलोची पातळी गाठली. जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात सकारात्मक बाजार धारणा राहिली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मर्यादित खरेदीमुळे सोन्याचा भाव स्थिर राहिला. दुसरीकडे औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांच्या मागणीने चांदीचा भाव पुन्हा ४० हजारांवर गेला.
जागतिक पातळीवर सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.६ टक्क्यांनी वाढून १,२३२.४४ डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या १७ फेब्रुवारीपासूनची ही उच्चांकी पातळी आहे. चांदीचा भावही १.६ टक्क्यांनी वधारून १७.७८ डॉलर प्रतिऔंस झाला. २९ जानेवारीनंतर चांदीच्या भावाची ही उच्चांकी पातळी आहे. दुसरीकडे तयार चांदीचा भाव ३५० रुपयांच्या तेजीसह ४०,००० रुपयांवर गेला. २४ जानेवारीपासूनची ही उच्चांकी पातळी आहे.
चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३८५ रुपयांनी वधारून ४०,३५५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी उंचावून खरेदीसाठी ५९,००० रुपये आणि विक्रीकरिता ६०,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे २७,८०० रुपये आणि २७,६५० रुपये
तोळा असा स्थिर राहिला. मर्यादित खरेदीमुळे आठ ग्रॅम गिन्नीचा भावही २३,९०० रुपयांवर कायम होता.
सोन्याचा भाव स्थिर;चांदीला नवी चकाकी
आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मर्यादित खरेदीमुळे सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २७,८०० रुपये तोळा असा कायम राहिला.
By admin | Updated: May 18, 2015 23:42 IST2015-05-18T23:42:49+5:302015-05-18T23:42:49+5:30
आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्या मर्यादित खरेदीमुळे सोमवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २७,८०० रुपये तोळा असा कायम राहिला.
