नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची किरकोळ खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी संमिश्र कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव २७,२५० या पूर्वपातळीवर कायम राहिला. दुसरीकडे औद्योगिक संस्थांच्या खरेदीत घट झाल्याने चांदीचा भाव १०० रुपयांनी कमी होऊन ३७,८०० रुपये प्रतिकिलो झाला. लंडन येथे सोन्याचा भाव ०.१८ टक्क्यांनी घसरून ११८५.४० डॉलर प्रतिऔंस राहिला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह ३७,८०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५ रुपयांच्या किरकोळ सुधारणेसह ३७,९४० रुपये प्रतिकिलोवर आला. मर्यादित व्यवहारामुळे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये आणि विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मर्यादित खरेदीने सोन्याचा भाव स्थिर; चांदीत घसरण
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची किरकोळ खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी संमिश्र कल नोंदला गेला
By admin | Updated: May 12, 2015 00:13 IST2015-05-12T00:13:58+5:302015-05-12T00:13:58+5:30
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्मात्यांची किरकोळ खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी संमिश्र कल नोंदला गेला
