नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी मागणी वाढल्याने सोमवारी सोन्याचा भाव ३० रुपयांनी वधारुन २७,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असून या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण निर्माते व रिटेलर्स यांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली आहे.
तथापि, चांदीचा भाव ८५ रुपयांच्या घसरणीसह ३८,२०० रुपये प्रतिकिलो राहिला. औद्योगिक संस्था व नाणे निर्माते यांच्याकडून मागणी घटल्याने ही घसरण झाल्याचे दिसून आले. बाजार जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घसरण सुरु आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीच्या बाजारात लग्नसराईच्या खरेदीने सोन्याचा भाव वधारला. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी घटून १,२१३.५२ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ०.४ टक्क्यांनी कमी होऊन १६.९६ डॉलर प्रतिऔंसवर राहिला.
तयार चांदीचा भाव ८५ रुपयांनी कमी होऊन ३८,२०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २०५ रुपयांनी घटून ३८,५०० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६४,००० रुपये व विक्रीकरता ६५,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भाव तेजीत; चांदीत घसरण सुरुच
लग तिसऱ्या दिवशी मागणी वाढल्याने सोमवारी सोन्याचा भाव ३० रुपयांनी वधारुन २७,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
By admin | Updated: December 16, 2014 05:03 IST2014-12-16T05:03:09+5:302014-12-16T05:03:09+5:30
लग तिसऱ्या दिवशी मागणी वाढल्याने सोमवारी सोन्याचा भाव ३० रुपयांनी वधारुन २७,३८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
