Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५६५ रुपयांनी तेजाळले सोने

५६५ रुपयांनी तेजाळले सोने

सोन्याचा भाव शुक्रवारी ५६५ रुपयांच्या उसळीसह दोन महिन्यांची उच्चांकी पातळी २७,८८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

By admin | Updated: January 17, 2015 01:16 IST2015-01-17T01:16:11+5:302015-01-17T01:16:11+5:30

सोन्याचा भाव शुक्रवारी ५६५ रुपयांच्या उसळीसह दोन महिन्यांची उच्चांकी पातळी २७,८८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

Gold prices up by Rs 565 | ५६५ रुपयांनी तेजाळले सोने

५६५ रुपयांनी तेजाळले सोने

नवी दिल्ली : सोन्याचा भाव शुक्रवारी ५६५ रुपयांच्या उसळीसह दोन महिन्यांची उच्चांकी पातळी २७,८८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण निर्मात्यांनी खरेदीचा जोर वाढविल्याने ही वृद्धी नोंदली गेली. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीत वाढ झाल्याने चांदीचा भावही ६२० रुपयांनी वधारून ३७,९०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा भाव सप्टेंबरच्या उच्चांकी पातळीवर गेला. स्वीत्झर्लंडने युरो चलनातून माघार घेऊन व्याजदर कपात केल्याने अमेरिकी डॉलरमध्ये घसरण नोंदली गेली. परिणामी स्थानिक बाजार धारणा बळकट झाली.
न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव २.७३ टक्क्यांच्या उसळीसह १,२६२.६० डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव ०.६८ टक्क्यांनी वधारून १६.९६ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
तयार चांदीचा भाव ६२० रुपयांनी वधारून ३७,९०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५४० रुपयांनी वाढून ३७,८४० रुपये प्रतिकिलो राहिला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांच्या तेजीसह खरेदीकरिता ६२,००० रुपये व विक्रीसाठी ६३,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold prices up by Rs 565

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.