नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि हंगामी खरेदीमुळे बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सकारात्मक कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारून २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८,००० रुपयांच्या पातळीवर गेला.
बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारात तेजीचा कल राहिल्याने स्थानिक सराफ्यातही जोरदार खरेदी झाली. आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी लग्नसराईची खरेदी केल्याने बाजार धारणेस सकारात्मक चालना मिळाली.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण नोंदल्याने आयात महाग झाली. तसेच समभाग बाजाराने जोरदार आपटी खाल्ल्याने सराफ्यात सकारात्मक कल राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी वधारून १,१९६.९५ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.२ टक्क्यांनी वाढून १६.५८ डॉलर प्रतिऔंस झाला.
> राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १३० रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे २७,३५० रुपये आणि २७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात काल २२० रुपयांची वाढ झाली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २३,७०० रुपयांवर कायम राहिला.
> तयार चांदीचा भाव २५० रुपयांनी वाढून ३८,००० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १,०२५ रुपयांनी उंचावून ३८,१४० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये आणि विक्रीकरिता ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला.
सोन्याच्या भावात १३० रुपयांची वाढ
जागतिक बाजारातील तेजी आणि हंगामी खरेदीमुळे बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सकारात्मक कल नोंदला गेला.
By admin | Updated: May 6, 2015 22:37 IST2015-05-06T22:37:04+5:302015-05-06T22:37:04+5:30
जागतिक बाजारातील तेजी आणि हंगामी खरेदीमुळे बुधवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सकारात्मक कल नोंदला गेला.
