नवी दिल्ली : जागतिक बाजारातील वाढीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारीही स्थानिक बाजारात तेजीचा कल कायम राहिला. सोन्याच्या भावात आणखी ७० रुपयांची भर पडून तो २७,५५० रुपये प्रति १० ग्रॅमवर गेला. सणासुदीच्या खरेदीला जागतिक बाजारातील तेजीने बळ मिळाले. चांदीचा भावही २०० रुपयांनी वाढून ३७,४५० रुपये प्रतिकिलोवर राहिला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीने ही वाढ नोंदली गेली आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, ज्वेलर्स व रिटेलर्स यांनी लग्नसराई हंगामातील मागणी पूर्ण करण्यासाठी जोरदार खरेदी केली. जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने तीन महिन्यांचा उच्चांक गाठला. परिणामी बाजारधारणेत सकारात्मक बदल दिसून आला.
देशांतर्गत बाजार कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वाढून १,२३९.३४ डॉलर प्रतिऔंस झाला. २३ आॅक्टोबर रोजी येथील बाजारात सोन्याचा भाव या पातळीवर होता. चांदीचा भाव १.७ टक्क्यांनी वाढून १५ डिसेंबरची उच्चांकी पातळी १६.८५ डॉलर प्रतिऔंस झाला.
९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,५५० रुपये व २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित खरेदीने २३,८०० रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून ३७,४५० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १४५ रुपयांनी वधारून ३७,३९० रुपये प्रति किलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही १,००० रुपयांनी उंचावून खरेदीसाठी ६२,००० रुपये व विक्रीकरिता ६३,००० रुपये प्रतिशेकड्यावर राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भाव आणखी ७० रुपयांनी वधारला
देशांतर्गत बाजार कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वाढून १,२३९.३४ डॉलर प्रतिऔंस झाला.
By admin | Updated: January 14, 2015 00:15 IST2015-01-14T00:15:31+5:302015-01-14T00:15:31+5:30
देशांतर्गत बाजार कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी वाढून १,२३९.३४ डॉलर प्रतिऔंस झाला.
