Lokmat Money > बिझनेस न्यूज > लग्नसराईमुळे सोने तेजीत

लग्नसराईमुळे सोने तेजीत

लग्नसराईच्या खरेदीने सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. गुरुवारी सोन्याचा भाव

By admin | Updated: May 1, 2015 23:46 IST2015-05-01T23:46:26+5:302015-05-01T23:46:26+5:30

लग्नसराईच्या खरेदीने सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. गुरुवारी सोन्याचा भाव

Gold prices rose due to wedding season | लग्नसराईमुळे सोने तेजीत

लग्नसराईमुळे सोने तेजीत

नवी दिल्ली : लग्नसराईच्या खरेदीने सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात तेजीचा कल नोंदला गेला. गुरुवारी सोन्याचा भाव ५५ रुपयांनी वधारून तीन महिन्यांचा उच्चांक २७,४७५ रुपये प्रति १० ग्र्रॅम झाला. लग्नसराईच्या खरेदीने बाजारात ही तेजी दिसून आली. चांदीचा भाव २०० रुपयांनी कोसळून ३७,४०० रुपये प्रतिकिलो झाला.
सध्या लग्नसराई सुरू असून जोरदार खरेदी सुरू आहे. दुसरीकडे जागतिक बाजारातील तेजीचेही यास बळ मिळाले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने आयात महागली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सराफ्यात योगदान दिले. लंडन येथे सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी उंचावून १,२०६.६० डॉलर प्रतिऔंस आणि चांदी ०.५७ टक्क्यांनी वधारून १६.६३ डॉलर प्रतिऔंस राहिला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे २०० रुपयांनी कोसळून ३७,४०० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १७० रुपयांनी वाढून ३७,४६० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरता ५६,००० रुपये आणि ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.

Web Title: Gold prices rose due to wedding season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.