नवी दिल्ली : आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहकांच्या खरेदीत वाढ झाल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव 13क् रुपयांनी वधारला. आठवडय़ाच्या प्रारंभी झालेल्या या वाढीमुळे सोन्याचा भाव 26,93क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भावही 1क्क् रुपयांच्या तेजीसह 36,65क् रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
व्यापा:यांनी सांगितले की, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. आभूषण निर्मात्यांकडून लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी या मौल्यवान धातूंची खरेदी झाली. चांदीचा भाव तेजीत राहिला. मात्र, जागतिक बाजारात यात नरमीचा कल नोंदला गेला आहे.
सिंगापुरात सोन्याचा भाव तीन आठवडय़ांच्या उच्चंकावरून घसरला आणि क्.2क् टक्क्यांनी घटून 1,198.6क् डॉलर प्रतिऔंस झाला. चांदीचा भावही क्.2क् टक्क्यांनी घटून 16.41 डॉलर प्रतिऔंस झाला.
दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 13क् रुपयांनी वधारून 26,93क् रुपये व 26,73क् रुपये प्रति 1क् ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 23,7क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भाव 1क्क् रुपयांच्या तेजीसह 36,65क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 8क् रुपयांनी वाढून 36,16क् रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 1,क्क्क् रुपयांनी वधारून खरेदीसाठी 61,क्क्क् रुपये व विक्रीकरिता 62,क्क्क् रुपये प्रतिशेकडा झाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)