नवी दिल्ली : सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी सोन्याचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून, ही गेल्या दोन आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. औद्योगिक संस्थाच्या मागणीअभावी चांदीचा भावही ५० रुपयांनी घटून ३८,४०० रुपये प्रतिकिलो राहिला.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी कमी होऊन १,१८४.३७ डॉलर प्रति औंस झाला. ही गेल्या १२ मे रोजीनंतरची नीचांकी पातळी आहे. लग्नसराईचा हंगाम असतानाही आभूषण विक्रेत्यांची मागणी सुस्त राहिली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,३५० रुपये आणि २७,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर राहिला. यापूर्वी सहा मे रोजी हा कल दिसून आला होता. मंगळवारी सोन्याचा भावात २५ रुपयांची घसरण झाली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,८०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव ५० रुपयांनी कमी होऊन ३८,८०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ४१५ रुपयांनी घटून ३८,५७५ रुपये प्रति किलोवर बंद झाला. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ५६,००० रुपये आणि विक्रीसाठी ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर स्थिर राहिला.
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी सोन्याचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
By admin | Updated: May 27, 2015 23:41 IST2015-05-27T23:41:06+5:302015-05-27T23:41:06+5:30
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली गेली आहे. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात बुधवारी सोन्याचा भाव १०० रुपयांच्या घसरणीसह २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
