नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक सराफ्यातील मागणी कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोन्याचा भाव १३० रुपयांनी घटून २६,३२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. लग्नसराईच्या काळात चांदीचा भावही ३२० रुपयांनी कोसळून ३५,७८० रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याचा भाव तीन महिन्यांच्या नीचांकीवर पोहोचला आहे. अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या मागणीत घट नोंदली गेली आहे. डॉलर मजबूत झाल्याने या मौल्यवान धातूवर दबाव
राहिला.
जागतिक बाजारात सोन्याचा भाव १,१४७.७२ डॉलर प्रतिऔंस एवढा झाला. दुसरीकडे चांदीचा भावही ०.९९ डॉलरने कोसळून १५.४७ डॉलर प्रतिऔंस राहिला.
तयार चांदीचा भाव ३२० रुपयांनी कोसळून ३५,७८० रुपये व साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ५१० रुपयांच्या आपटीसह ३५,२७५ रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. दुसरीकडे चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये व चांदी ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात १३० रुपयांनी घट
जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक सराफ्यातील मागणी कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोन्याचा भाव १३० रुपयांनी घटून २६,३२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
By admin | Updated: March 13, 2015 00:29 IST2015-03-13T00:29:22+5:302015-03-13T00:29:22+5:30
जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक सराफ्यातील मागणी कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोन्याचा भाव १३० रुपयांनी घटून २६,३२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला
