Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा भाव महिन्याच्या नीचांकावर; चांदीही स्वस्त

सोन्याचा भाव महिन्याच्या नीचांकावर; चांदीही स्वस्त

शुक्रवारी २00 रुपयांच्या घसरणीनंतर सोने २७ हजार रुपये तोळा झाले. हा सोन्याचा महिनाभराचा नीचांक ठरला.

By admin | Updated: June 6, 2015 00:02 IST2015-06-06T00:02:30+5:302015-06-06T00:02:30+5:30

शुक्रवारी २00 रुपयांच्या घसरणीनंतर सोने २७ हजार रुपये तोळा झाले. हा सोन्याचा महिनाभराचा नीचांक ठरला.

Gold prices fall to month low; Silver cheap | सोन्याचा भाव महिन्याच्या नीचांकावर; चांदीही स्वस्त

सोन्याचा भाव महिन्याच्या नीचांकावर; चांदीही स्वस्त

नवी दिल्ली : शुक्रवारी २00 रुपयांच्या घसरणीनंतर सोने २७ हजार रुपये तोळा झाले. हा सोन्याचा महिनाभराचा नीचांक ठरला. जागतिक बाजारातील नरमाई आणि ज्वेलर्स तसेच रिटेलर्स यांनी खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे बाजार उतरला आहे.
औद्योगिक क्षेत्राकडून तसेच नाणे निर्मात्यांकडून मागणी घटल्यामुळे चांदीचा भाव १ हजार रुपयांनी उतरून ३७,४00 रुपये किलो झाला.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात घसरणीचा कल सुरू असल्यामुळे सोने चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे. त्याचा देशांतर्गत सोने बाजारावर परिणाम झाला आहे.
न्यूयॉर्कमधील बाजारात काल सोन्याचा भाव 0.७३ टक्क्यांनी घटून १,१७६ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव २.४३ टक्क्यांनी घटून १६.0८ डॉलर प्रति औंस झाला. याचबरोबर रुपया वधारल्याचा परिणाम सराफा बाजारावर दिसून आला. रुपयाची डॉलरच्या तुलनेतील मजबुतीमुळे सोन्याची आयात स्वस्त होते. त्यामुळे सोन्याचा घसरणीस हातभार लागला, असे व्यावसायिकांनी सांगितले.
८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर २३,७00 रुपये असा कायम राहिला. मर्यादित स्वरूपातील व्यवहारांचा लाभ गिन्नीला मिळाला. तयार चांदीचा भाव १,000 रुपयांनी घसरून ३७,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ८५0 रुपयांनी घसरून ३७,0८0 रुपये किलो झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ५४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५५ हजार रुपये शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

४राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के तसेच ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २00 रुपयांनी उतरून अनुक्रमे २७,000 रुपये आणि २६,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. ४ मे रोजी सोने या पातळीवर होते. काल सोने १४0 रुपयांनी घसरले होते.

Web Title: Gold prices fall to month low; Silver cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.