नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांची मागणी कमी झाल्याने गुरुवारी सोन्याच्या भावात सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. आज सोन्याचा भाव ४० रुपयांनी घटून २६,७५० रुपये प्रतिकिलो राहिला. तथापि, औद्योगिक संस्थांच्या खरेदीने चांदीचा भाव १५० रुपयांनी वधारून ३६,५५० रुपये प्रति किलो झाला.
बाजारातील जाणकारांच्या मते, जागतिक बाजारात सोन्याचा भाव कमजोर राहिला आणि स्थानिक सराफ्यातही या मौल्यवान धातूची मागणी घटली. समभाग बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आपले भांडवल सराफा बाजारातून वळते केले आहे.
न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ०.२५ टक्क्यांनी कमी होऊन १,१७५ डॉलर प्रति औंस झाला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव १५० रुपयांनी सुधारून ३६,५५० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ९५ रुपयांच्या तेजीसह ३६,२०५ रुपये प्रति किलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव मर्यादित व्यवहारामुळे खरेदीकरिता ५४,००० रुपये व विक्रीसाठी ५५,००० रुपये प्रति शेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात झाली आणखी ४० रुपयांची घट
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांची मागणी कमी झाल्याने गुरुवारी सोन्याच्या भावात
By admin | Updated: June 26, 2015 00:11 IST2015-06-26T00:11:05+5:302015-06-26T00:11:05+5:30
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांची मागणी कमी झाल्याने गुरुवारी सोन्याच्या भावात
