नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. आज सोन्याचा भाव मर्यादित खरेदीमुळे ७० रुपयांनी घसरून २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.
औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी कमी झाल्याने चांदीचा भावही १४० रुपयांच्या घसरणीसह ३६,८६० रुपये प्रतिकिलो राहिला.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर सराफा व्यापाऱ्यांनी खरेदी कमी केली आणि जागतिक बाजार घसरणीचा कल राहिला. परिणामी स्थानिक सराफ्यात घसरणीचा कल नोंदला गेला. जागतिक बाजारात सोन्याच्या भावाने दोन आठवड्यांचा तळ गाठला.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी घटून १,१९०.१८ डॉलर प्रतिऔंस झाला. गेल्या एक एप्रिल रोजी सोन्याचा भाव या पातळीवर होता. चांदीचा भावही एक टक्क्याने घटून १६.११ डॉलर प्रतिऔंस झाला. २० मार्चनंतरची ही नीचांकी पातळी आहे. सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भावही १४० रुपयांनी घटून ३६,८६० रुपये प्रति किलो आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही एवढ्याच फरकाने कमी होऊन ३६,५६० रुपये प्रति किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी कोसळून खरेदीकरिता ५५,००० रुपये व विक्रीसाठी ५६,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
च्राजधानीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७० रुपयांच्या घसरणीसह अनुक्रमे २७,०५० रुपये आणि २६,९०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव १०० रुपयांनी कोसळून २३,६०० रुपयांवर बंद झाला.
तीन दिवसांनंतर सोन्याच्या भावात घट
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.
By admin | Updated: April 15, 2015 01:50 IST2015-04-15T01:50:32+5:302015-04-15T01:50:32+5:30
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली.
