Lokmat Money > बिझनेस न्यूज > सणासुदीत सोन्याचा भाव घसरला

सणासुदीत सोन्याचा भाव घसरला

राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिस:या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली.

By admin | Updated: September 3, 2014 14:26 IST2014-09-03T03:17:00+5:302014-09-03T14:26:29+5:30

राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिस:या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली.

Gold prices declined during the festive season | सणासुदीत सोन्याचा भाव घसरला

सणासुदीत सोन्याचा भाव घसरला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सलग तिस:या दिवशी सोन्याच्या भावातील घसरण कायम राहिली. दिल्लीत सोन्याचा भाव 155 रुपयांनी कमी होऊन 28,क्2क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. सोन्याच्या भावाची ही एक आठवडय़ाची नीचांकी पातळी आहे.
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर व्यापा:यांची मागणी घटल्याने सराफ्यात हा कल दिसून आला. औद्योगिक संस्था व नाणो निर्मात्यांकडून मागणी न मिळाल्याने चांदीचा भावही 1क्क् रुपयांनी उतरून 42,7क्क् रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
सराफा व्यापा:यांनी सांगितले की, सणासुदीचा काळ असतानाही जागतिक बाजारातील कमजोर स्थितीमुळे सोने-चांदीला उठाव मिळत नाही. गुंतवणूकदारांचे पाठबळ न मिळाल्याने दिल्लीत सोन्याच्या भावाने आठवडाभराची नीचांकी पातळी गाठली आहे. युक्रेन व रशिया यातील तणावाचा जागतिक बाजारावर दबाव आहे. दरम्यान, शेअर बाजार ऐतिहासिक आगेकूच करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांचा कलही समभाग खरेदीकडे आहे.
सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.8क् टक्क्यांनी घसरून 1,275 डॉलर प्रतिऔंस झाला. ही गेल्या 26 ऑगस्टची नीचांकी पातळी आहे. चांदीचा भावही क्.4क् टक्क्याच्या घसरणीने 19.39 डॉलर प्रतिऔंसवर आला. तयार चांदीचा भावही 1क्क् रुपयांनी घटून 42,7क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 5क् रुपयांनी कमी होऊन 42,19क् रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरता 74,क्क्क् रुपये व विक्रीसाठी 75,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ावर कायम राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 155 रुपयांनी घटून अनुक्रमे 28,क्2क् रुपये व 27,82क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
4गेल्या दोन सत्रंत 125 रुपयांची घट झाली आहे. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित व्यवहारामुळे 24,6क्क् रुपयांवर कायम राहिला.

 

Web Title: Gold prices declined during the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.