Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याच्या भावात तेजीचा कल कायम

सोन्याच्या भावात तेजीचा कल कायम

येथील सराफा बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव ७० रुपयांनी वधारून २७,३४० रुपये प्रति

By admin | Updated: June 4, 2015 00:49 IST2015-06-04T00:49:58+5:302015-06-04T00:49:58+5:30

येथील सराफा बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव ७० रुपयांनी वधारून २७,३४० रुपये प्रति

Gold prices continued to remain bullish | सोन्याच्या भावात तेजीचा कल कायम

सोन्याच्या भावात तेजीचा कल कायम

नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल नोंदला गेला. आज सोन्याचा भाव ७० रुपयांनी वधारून २७,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात हा कल दिसून आला. चांदीचा भावही १०० रुपयांनी वधारून ३८,७०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे विक्रेत्यांच्या खरेदीने या मौल्यवान धातूमध्ये ही वाढ नोंदली गेली.
बाजार सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीत वाढ झाली. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारल्याने कमजोर शेअर बाजारातील गुंतवणूक सराफ्यात वळती झाली. याचाही बाजार धारणेवर परिणाम झाला.
राजधानी दिल्लीच्या सराफ्यात ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७० रुपयांनी उंचावून अनुक्रमे २७,३४० रुपये व २७,१९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात काल ४५ रुपयांची वाढ झाली होती. तथापि, आठ
ग्रॅम गिन्नीचा भाव मर्यादित खरेदीमुळे २३,७०० रुपयांवर कायम
राहिला.
तयार चांदीचा भाव १०० रुपयांच्या बळकटीसह ३८,७०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १२५ रुपयांनी वधारून ३८,४४५ रुपये प्रतिकिलो झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव कोणत्याही बदलाशिवाय खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरिता
५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold prices continued to remain bullish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.