नवी दिल्ली : जागतिक बाजारात मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव मर्यादित मागणीमुळे २६,३२० रुपये प्रति १० ग्रॅम कायम राहिला. तथापि, चांदीचा भाव २० रुपयांनी वाढून ३५,८०० रुपये प्रतिकिलो राहिला.
जाणकारांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांनी मर्यादित खरेदी केल्यामुळे सोन्याचा भाव स्थिर राहिला. जागतिक बाजारात सोन्याचा भाव ०.७ टक्क्यांनी वधारून १,१६१.८५ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
दुसरीकडे तयार चांदीचा भाव २० रुपयांनी वाढून ३५,८०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही २०० रुपयांनी उंचावून ३५,४७५ रुपये प्रतिकिलोवर गेला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव मागणी घटल्याने १,००० रुपयांनी कोसळून खरेदीकरता ५५,००० रुपये व विक्रीसाठी ५६,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. बाजारात नरमाईचे वातावरण दिसून आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मर्यादित मागणीमुळे सोन्याचा भाव स्थिर
जागतिक बाजारात मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव मर्यादित मागणीमुळे २६,३२० रुपये प्रति
By admin | Updated: March 13, 2015 23:59 IST2015-03-13T23:59:55+5:302015-03-13T23:59:55+5:30
जागतिक बाजारात मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव मर्यादित मागणीमुळे २६,३२० रुपये प्रति
