नवी दिल्ली : जागतिक बाजारात तेजी असतानाही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी किरकोळ व्यापाऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे चित्र होते. आज सोन्याचा भाव २७,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिला. दुसरीकडे औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी वाढल्याने चांदीचा भाव ५०० रुपयांच्या तेजीसह ३७,००० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, किरकोळ व आभूषण निर्मात्यांची अल्प मागणी व आशियाई बाजारात मजबूत कल या पार्श्वभूमीवर सोन्याचा भाव स्थिर राहिला. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव १.३ टक्क्याने उंचावून ११८९.०८ डॉलर व चांदीचा भाव २ टक्क्यांच्या तेजीसह १६.०२ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे २७,००० रुपये व २६,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर अपरिवर्तनीय राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही २३,७०० रुपयांवर स्थिर राहिला.
तयार चांदीचा भाव ५०० रुपयांच्या तेजीसह ३७,००० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ६८० रुपयांनी उंचावून ३७,१५० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५९,००० रुपये व विक्रीकरिता ६०,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भाव स्थिर तर चांदीला झळाळी
जागतिक बाजारात तेजी असतानाही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी किरकोळ व्यापाऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.
By admin | Updated: December 27, 2014 01:42 IST2014-12-26T23:34:07+5:302014-12-27T01:42:14+5:30
जागतिक बाजारात तेजी असतानाही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी किरकोळ व्यापाऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे चित्र होते.
