मुंबई : सोने आयातीला आळा घालण्यासाठी ८0:२0 योजना आणल्यानंतरही गेल्या आर्थिक वर्षातील सोन्याची आयात २0१३च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे साडेआठ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षात देशातील सोन्याची आयात ८४९ टन होती.
गेल्या वर्षी जूनपासून सोन्याची आयात दर महिन्याला सरासरी ९0 टन इतकी होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये अनेक निर्बंध शिथिल केल्यानंतरही आयात १५१ टनाच्या घरात गेली.
सोने आयात कमी होण्यासाठी २0१३च्या दुसऱ्या सहामाहीत ८0:२0चे निर्र्बध घालण्यात आले होते. त्यानुसार आयातीतील २0 टक्के सोन्याचे दागिने करून ते निर्यात करण्याची ही अट होती. या निर्बंधांमुळे काही प्रमाणात आयात घटली होती. मात्र, गेल्या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याची मागणी वाढल्याने आयातीत वाढ झाली.
गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत आयातीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या तिमाहीत २0१३च्या दुसऱ्या तिमाहीनंतर सोन्याची सर्वांत अधिक म्हणजेच २९६ टन आयात झाली.
गेल्या डिसेंबर महिन्याचा अपवाद वगळता सोन्याची आयात वाढलेलीच दिसून येते. डिसेंबर महिन्यात मात्र आयातीत सुमारे ८0 टक्के घट झाली आहे. यामुळे या महिन्यात गेल्या १५ महिन्यांतील सर्वांत कमी आयात नोंदविली गेली. डिसेंबर २0१३च्या तुलनेत ती ७ टनाने कमी होती.
रिद्धी सिद्धी ज्वेलर्सचे पृथ्वीराज कोठारिया यांनी सांगितले, की सध्या सोन्याची मागणी कमालीची घटली आहे. येत्या काही महिन्यांत मागणीत फारशी वाढ होईल, असे वाटत नाही. सरकार अर्थसंकल्पात सोने आयातीवरील कर कमी करेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे देशातील किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक वातावरण आणि मागणीचा जोर वाढल्याने राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ७० रुपयांनी वाढत २७,५७० रुपयांवर गेला. गेल्या दोन महिन्यांतील हा उच्चांक असून सलग चार दिवसांपासून दिल्ली सराफा बाजारात सोने तेजीने चमकत आहे.
सोन्यासोबत चांदीही प्रतिकिलो २५० रुपयांनी झळाळत ३७,५५० रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सोन्याची चकाकी वाढली.
युरोपीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाढल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली.
याशिवाय लग्नसराईमुळे दागदागिने विक्रे त्यांकडून खरेदीचा जोर वाढल्याने तेजीला बळ
मिळाले.
गेल्या तीन दिवसांत दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४७५ रुपयांनी तेजाळला.
न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस १,२१९.३० डॉलर, तर चांदीचा भाव प्रति औंस १६.६५ डॉलरवर होता.
निर्बंधांनंतरही सोन्याच्या आयातीत ८.५ टक्के वाढ!
आर्थिक वर्षातील सोन्याची आयात २0१३च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे साडेआठ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
By admin | Updated: January 7, 2015 23:33 IST2015-01-07T23:33:38+5:302015-01-07T23:33:38+5:30
आर्थिक वर्षातील सोन्याची आयात २0१३च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे साडेआठ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
