नवी दिल्ली : सोन्याच्या आयातीवरील कर कमी करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण बुधवारी सरकारने केले.
गेल्या वर्षी आयात करामध्ये १० टक्के वाढ झाल्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली होती. आयात करात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या तस्करीत वाढ झाली, असे मी म्हणू शकत नाही. चालू खात्यातील तूट कमी झाली असली तरी लगेचच आयात कर घटविण्याचा कोणताही विचार नाही, असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
२०१३-२०१४ मध्ये ६३८ टन सोने आयात झाले. त्याआधीच्या वर्षी ते ८४५ टन होते. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या आयातीवरील शुल्कात कपात करावी, अशी मागणी होत आहे. २०१३ मध्ये सोन्याच्या आयातीत एकदम वाढ झाल्यामुळे सरकारने त्याच्या आयात करात टप्प्याटप्प्याने १० टक्के वाढ केली होती. परकीय चलनाचा देशाबाहेर जाणारा ओघ घटविण्यासाठी सरकार व रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या आयातीचे प्रमाण त्याच्या निर्यातीशी जोडण्यासह अन्य अनेक निर्बंध घातले होते. त्याच्या परिणामी सोन्याची तस्करी वाढली. सोन्याच्या आयातीचे २०११-१२ मध्ये ५००, २०१२-१३ मध्ये ८६९ व २०१३-१४ मध्ये २,४४१ प्रकार घडले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्यावरील आयात कर जैसे थे
सोन्याच्या आयातीवरील कर कमी करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण बुधवारी सरकारने केले.
By admin | Updated: September 11, 2014 02:44 IST2014-09-11T02:44:32+5:302014-09-11T02:44:32+5:30
सोन्याच्या आयातीवरील कर कमी करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण बुधवारी सरकारने केले.
