नवी दिल्ली : जागतिक बाजारातील सुधारणेमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी मागणीत अल्प वाढ झाल्याने सोन्याचा भाव ५ रुपयांनी वधारून २८,२५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भाव मात्र, ५० रुपयांनी घटून ४४,८५० रुपये प्रतिकिलो झाला.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या काळातील ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने रिटेलर्सद्वारे खरेदी झाल्याने सोन्याच्या भावात ही तेजी नोंदली गेली. जागतिक बाजारातही तेजीचा कल दिसून आला.
लंडन बाजारात सोन्याचा भाव ०.२० टक्क्याने वाढून १,२८४.९१ डॉलर प्रतिऔंस झाला.
दिल्ली बाजारातच ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,२५० आणि २८,०५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,७०० रुपयांवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मागणी वाढल्याने सोने तेजीत; चांदी घसरली
जागतिक बाजारातील सुधारणेमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी मागणीत अल्प वाढ झाल्याने सोन्याचा भाव ५ रुपयांनी वधारून २८,२५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला
By admin | Updated: August 2, 2014 03:49 IST2014-08-02T03:49:41+5:302014-08-02T03:49:41+5:30
जागतिक बाजारातील सुधारणेमुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी मागणीत अल्प वाढ झाल्याने सोन्याचा भाव ५ रुपयांनी वधारून २८,२५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला
