नवी दिल्ली : विदेशी बाजारात चढ-उतार चालू असतानाच शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात गेल्या २३ महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण होताना सोन्याचे भाव ७४0 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने २८५१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदीही २५0 रुपयांनी घसरून ३८४00 रुपये प्रतिकिलो झाली.
सोन्याच्या या भावाचा गेल्या ९ आठवड्यांतील नीचांकी स्तर आहे. सात आठवड्यांच्या संपानंतर शुक्रवारी व्यावसायिक दिवसाच्या दुसऱ्या दिवशी स्टँडर्ड सोने ७४0 रुपयांनी घसरले. २२ मे २0१४ नंतर ही सोन्याची सर्वाधिक घसरण आहे. त्यामुळे सोने २८,५१0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. ८ फेब्रुवारी २0१६ नंतरचा हा सर्वात नीचांकी स्तर आहे.
लंडन आणि न्यूयॉर्क येथून आलेल्या वृत्तानुसार स्टँडर्ड सोने २.१ डॉलरने मजबूत होऊन ते १२३0 डॉलर प्रति औंस झाले. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात एक टक्का घट झाली आहे. अमेरिकी वायदा सोन्याचे भावही पाच डॉलरनी वाढून १२३0 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकेतील अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर झाली असून, त्या देशावर अजूनही मंदीची छाया
आहे.
त्यामुळे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदर वाढविण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोन्याचे भाव वाढले, असे विश्लेषकांनी सांगितले. स्थानिक बाजारात ९९.५ या शुद्धतेच्या सोन्याचे भावही ७४0 रुपयांनी घसरून २८,३६0 प्रति १0 ग्रॅम झाले.
औद्योगिक मागणी घटल्याने चांदीचे भावही २५0 रुपयांनी घसरले. त्यामुळे चांदी ३८,४00 रुपये प्रतिकिलोवर आली. चांदीच्या नाण्याचे भाव मात्र स्थिर राहिले. १00 नाण्यांच्या खरेदीचा भाव ५८ हजार रुपये, तर विक्रीचा भाव ५९ हजार रुपये राहिले. बाजारात मागणी घटल्याने सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आॅल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. के. जैन यांनी सांगितले की, संपामुळे सात आठवडे बाजार बंद होता. त्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम आज दिसून आला. या काळात ग्राहक घटले. त्यामुळे या मौल्यवान धातूवरील दडपण वाढले. सराफा व्यापारी संपावर गेले होते, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव १२५५ डॉलर प्रति औंस होते. आता ते कमी होऊन १२३0 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
सोन्याची दोन वर्षांतील मोठी घसरण
विदेशी बाजारात चढ-उतार चालू असतानाच शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात गेल्या २३ महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण होताना सोन्याचे भाव ७४0 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने
By admin | Updated: April 16, 2016 03:07 IST2016-04-16T03:07:12+5:302016-04-16T03:07:12+5:30
विदेशी बाजारात चढ-उतार चालू असतानाच शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात गेल्या २३ महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण होताना सोन्याचे भाव ७४0 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने
