नवी दिल्ली : स्थानिक बाजारांत मागणीत झालेली घट आणि जागतिक पातळीवरील किमतीतील घसरण यामुळे सोमवारी सराफा बाजारास मोठा फटका बसला. सोने १८0 रुपयांनी घसरून २६,८१0 रुपये तोळा झाले. हा तीन आठवड्यांचा नीचांक ठरला. चांदी ३१५ रुपयांनी घसरून ३५,६00 रुपये किलो झाली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर अमेरिकेच्या संभाव्य व्याजदर वाढीची भीती आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदरांत वाढ करील, असे संकेत आहेत. त्यामुळे भाव घसरत आहेत. सिंगापुरातील बाजारात सोने 0.७ टक्क्यांनी घसरून १,१३७.७३ डॉलर प्रति औंस झाले. चांदी १.१ टक्क्यांनी घसरून १४.९४ डॉलर प्रति औंस झाली.
पितृपक्ष सुरू झाल्यामुळे भारतीय बाजारांत सोन्या-चांदीच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. ज्वेलर आणि रिटेलरांनीही खरेदी कमी केली आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव आहे. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २६,८१0 रुपये आणि २६,६६0 रुपये तोळा झाला. ३ सप्टेंबर रोजी सोने या पातळीवर होते. शनिवारी सोन्याचा भाव २६0 रुपयांनी घसरला होता. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव २२,४00 रुपये असा स्थिर राहिला.
सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव ३१५ रुपयांनी घसरून ३५,६00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २१0 रुपयांनी घसरून ३५,८८0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ५१ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५२ हजार रुपये प्रति शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने तीन आठवड्यांच्या नीचांकावर; चांदीही नरम
स्थानिक बाजारांत मागणीत झालेली घट आणि जागतिक पातळीवरील किमतीतील घसरण यामुळे सोमवारी सराफा बाजारास मोठा फटका बसला. सोने १८0 रुपयांनी घसरून
By admin | Updated: September 28, 2015 23:23 IST2015-09-28T23:23:18+5:302015-09-28T23:23:18+5:30
स्थानिक बाजारांत मागणीत झालेली घट आणि जागतिक पातळीवरील किमतीतील घसरण यामुळे सोमवारी सराफा बाजारास मोठा फटका बसला. सोने १८0 रुपयांनी घसरून
