Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने ४१० रुपयांनी उतरले

सोने ४१० रुपयांनी उतरले

कमजोर जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव ४१० रुपयांनी कोसळून

By admin | Updated: March 31, 2015 01:19 IST2015-03-31T01:19:10+5:302015-03-31T01:19:10+5:30

कमजोर जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव ४१० रुपयांनी कोसळून

Gold dropped by Rs 410 | सोने ४१० रुपयांनी उतरले

सोने ४१० रुपयांनी उतरले

नवी दिल्ली : कमजोर जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव ४१० रुपयांनी कोसळून २६,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या कमजोर मागणीमुळे चांदीचा भावही ५५० रुपयांच्या घसरणीसह ३८,००० रुपये प्रतिकिलो राहिला.
सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, आभूषण विक्रेत्यांच्या कमजोर मागणीसोबतच अमेरिकी फेडरल रिझर्व्हद्वारा चालू वर्षअखेरीस व्याजदर वाढीचे संकेत आहेत. यामुळे जागतिक बाजारात घसरणीचा कल राहिला. परिणामी देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या भावात घसरण नोंदली
गेली.
देशांतर्गत बाजार कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर सराफ्यात सोन्याचा भाव ०.५ टक्क्यांनी घटून १,१९२.५० डॉलर प्रतिऔंस राहिला. चांदीचा भावही ०.३ टक्क्यांनी कमी होऊन १६.९० डॉलर झाला.
सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भावही ५५० रुपयांनी कोसळून ३८,००० रुपये प्रतिकिलो आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३३० रुपयांच्या घसरणीसह ३७,९९० रुपये प्रतिकिलो झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भावही १,००० रुपयांच्या हानीसह मागणीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरता ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold dropped by Rs 410

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.