नवी दिल्ली : जागतिक बाजारात तेजी असतानाही मंगळवारी भारतीय सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव १९0 रुपयांनी घसरून २५,३00 रुपये प्रति तोळा झाला. चांदी १५0 रुपयांनी घसरून ३४,0५0 रुपये किलो झाली.
दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांकडून असलेली मागणी घटल्यामुळे सोने उतरले. सोन्याचा भाव आणखी कमी होईल, अशी चर्चा बाजारात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही खरेदी थांबविली आहे. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १९0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २५,३00 रुपये आणि २५,१५0 रुपये तोळा झाला. गेल्या दोन सत्रांत सोन्याचा भाव ४४0 रुपयांनी वाढला होता. सोन्याच्या १0 ग्रॅम गिन्नीचा भाव २00 रुपयांनी घसरून २२,२00 रुपये झाला. तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी घसरून ३४,0५0 रु. किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १२0 रुपयांनी घसरून ३३,७६५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी घसरून खरेदीसाठी ४९ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५0 हजार रुपये प्रति शेकडा झाला.
सोने १९0 रुपयांनी उतरले
जागतिक बाजारात तेजी असतानाही मंगळवारी भारतीय सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव १९0 रुपयांनी घसरून २५,३00 रुपये प्रति तोळा झाला.
By admin | Updated: July 29, 2015 02:51 IST2015-07-29T02:51:35+5:302015-07-29T02:51:35+5:30
जागतिक बाजारात तेजी असतानाही मंगळवारी भारतीय सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव १९0 रुपयांनी घसरून २५,३00 रुपये प्रति तोळा झाला.
