नवी दिल्ली : ३ महिन्यांच्या उच्चांकावर असलेल्या सोन्या-चांदीच्या बाजारात शुक्रवारी घसरण झाली. सोने १८0 रुपयांनी उतरून २७,७१0 रुपये तोळा (१0 ग्रॅम) झाले. चांदीचा भावही १00 रुपयांनी उतरून ३९,४00 रुपये किलो झाला आहे. जागतिक पातळीवर सोन्यामध्ये घसरण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारांत दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी कमी केली. त्यामुळे सराफा बाजारात घसरण झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोने तेजीत होते. या दोन दिवसांच्या काळात सोन्याचा भाव ६४0 रुपयांनी वाढला होता. या तेजीला आता ब्रेक लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्या-चांदीची आयात स्वस्त होणार आहे. त्याचाही परिणाम किमती उतरण्यावर झाल्याचे सांगण्यात आले.
सराफा बाजारांतील किमती निर्धारित करणाऱ्या सिंगापूर बाजारात सोने 0.२ टक्क्यांनी घसरून १,२१८.९५ डॉलर प्रति औंस झाले. चांदीची 0.५ टक्क्यांनी घसरून १७.३७ डॉलर प्रतिऔंस झाली.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव १८0 रुपयांनी उतरून अनुक्रमे २७,७१0 रुपये आणि २७,५६0 रुपये तोळा झाला. ८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर म्हणजेच २३,९00 रुपयांवर कायम राहिला. मर्यादित व्यवहारांमुळे गिन्नी स्थिर राहिली. तयार चांदीचा भाव १00 रुपयांनी घसरून ३९,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र १८५ रुपयांनी वाढून ३९,६३५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही १ हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ५८ हजार रुपये शेकडा, तर विक्रीसाठी ५९ हजार रुपये शेकडा झाला.
सोने १८0 रुपयांनी उतरले
: ३ महिन्यांच्या उच्चांकावर असलेल्या सोन्या-चांदीच्या बाजारात शुक्रवारी घसरण झाली. सोने १८0 रुपयांनी उतरून २७,७१0 रुपये तोळा
By admin | Updated: May 16, 2015 01:02 IST2015-05-16T01:02:38+5:302015-05-16T01:02:38+5:30
: ३ महिन्यांच्या उच्चांकावर असलेल्या सोन्या-चांदीच्या बाजारात शुक्रवारी घसरण झाली. सोने १८0 रुपयांनी उतरून २७,७१0 रुपये तोळा
