नवी दिल्ली : सलग दोन दिवस भाव वाढल्यानंतर सोमवारी सोने १० ग्रॅममागे ५० रुपयांनी स्वस्त होऊन २५,९५0 रुपये झाले. मात्र, चांदी किलोमागे ५० रुपयांनी वधारली. जागतिक बाजारात मंद मागणी आणि दागिने निर्मात्यांकडून नसलेला प्रतिसाद यामुळे सोने उतरले. औद्योगिक क्षेत्रातून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदी ५० रुपयांनी वाढून किलोला ३५,००० रुपये झाली. सिंगापूरच्या बाजारात औंसमागे सोने ०.३ टक्क्याने घसरून १,८२.८३ अमेरिकन डॉलर झाले.
जागतिक बाजारात सोन्याला नसलेली मागणी, दागिने निर्माते व किरकोळ व्यापाऱ्यांकडून घटलेली मागणी सोन्याच्या भावाला घटविण्यास कारणीभूत ठरली.
राजधानी दिल्लीतील सराफ बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० गॅ्रममागे ५० खाली उतरून अनुक्रमे २५,९५० व २५,८०० रुपये झाले. गेल्या दोन दिवसांत सोने ६०० रुपयांनी वाढले होते. आठ ग्रॅमच्या सोन्याचा भाव १०० रुपयांनी खाली येऊन २२,२०० रुपये झाला. तयार चांदी किलोमागे ५० रुपयांनी वाढून ३५,००० रुपये, तर वीकली बेसड् डिलेव्हरीची चांदी २५ रुपयांनी महाग होऊन ३५,१८५ रुपये झाली. दरम्यान, चांदीच्या १०० नाण्यांच्या खरेदीचा भाव ४८,००० व विक्रीचा भाव ४९,००० रुपये होता.
सोने घसरले, चांदी मात्र वधारली
सलग दोन दिवस भाव वाढल्यानंतर सोमवारी सोने १० ग्रॅममागे ५० रुपयांनी स्वस्त होऊन २५,९५0 रुपये झाले. मात्र, चांदी किलोमागे ५० रुपयांनी वधारली.
By admin | Updated: December 8, 2015 01:54 IST2015-12-08T01:54:58+5:302015-12-08T01:54:58+5:30
सलग दोन दिवस भाव वाढल्यानंतर सोमवारी सोने १० ग्रॅममागे ५० रुपयांनी स्वस्त होऊन २५,९५0 रुपये झाले. मात्र, चांदी किलोमागे ५० रुपयांनी वधारली.
