नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी, यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३00 रुपयांनी घसरून २५,७00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. त्याबरोबर सोने २ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे.
चांदीचा भाव १५0 रुपयांनी घसरून ३४,२00 रुपये किलो झाला आहे. औद्योगिक क्षेत्राकडून, तसेच नाणे निर्मात्यांकडून असलेली नियमित मागणी घटल्याचा फटका चांदीला बसला.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोने पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले आहे. अमेरिकेकडून व्याजदरात वाढ करण्याची शक्यता निर्माण झालेली असल्यामुळे जागतिक बाजारात सोने घसरले आहे. याचा फटका भारतीय बाजारांनाही बसला.
सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव ४.२ टक्क्यांनी घसरून १,0८६.१८ डॉलर प्रति औंस झाला आहे. मार्च २0१0 नंतरची ही सर्वांत कमी किंमत ठरली आहे. चांदीचा भाव २.३ टक्क्यांनी घसरून १४.५४ डॉलर प्रति औंस झाला. डिसेंबर २0१४ नंतरची ही सर्वांत कमी किंमत ठरली आहे.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ३00 रुपयांनी घसरून अनुक्रमे २५,७00 रुपये आणि २५,५५0 रुपये तोळा झाला. जून २0१३ नंतरची ही सर्वांत कमी किंमत ठरली आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या शिक्क्यांचा भाव २00 रुपयांनी घसरून २२,७00 रुपये झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोने दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर
जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी, यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३00 रुपयांनी घसरून
By admin | Updated: July 21, 2015 00:14 IST2015-07-21T00:14:43+5:302015-07-21T00:14:43+5:30
जागतिक बाजारातील घसरण आणि स्थानिक ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी, यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव ३00 रुपयांनी घसरून
