Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने १४० रुपयांनी घसरले; चांदी मात्र स्थिर

सोने १४० रुपयांनी घसरले; चांदी मात्र स्थिर

सराफा बाजारात गेल्या तीन सत्रात झालेली तेजी बुधवारी समाप्त झाली. परदेशात कमी उठाव असल्यामुळे स्थानिक बाजारात सराफांकडूनही मागणी घटली

By admin | Updated: December 24, 2015 00:18 IST2015-12-24T00:18:25+5:302015-12-24T00:18:25+5:30

सराफा बाजारात गेल्या तीन सत्रात झालेली तेजी बुधवारी समाप्त झाली. परदेशात कमी उठाव असल्यामुळे स्थानिक बाजारात सराफांकडूनही मागणी घटली

Gold down by Rs 140 Silver is stable only | सोने १४० रुपयांनी घसरले; चांदी मात्र स्थिर

सोने १४० रुपयांनी घसरले; चांदी मात्र स्थिर

नवी दिल्ली : सराफा बाजारात गेल्या तीन सत्रात झालेली तेजी बुधवारी समाप्त झाली. परदेशात कमी उठाव असल्यामुळे स्थानिक बाजारात सराफांकडूनही मागणी घटली. परिणामत: सोने १४० रुपयांनी घसरून २५,६१० रुपये प्रति १० ग्रॅम झाले.
दुसरीकडे उद्योगांकडून मागणी कायम राहिल्याने चांदीचे भाव ३४,१०० रुपयांवर स्थिर राहिले. जागतिक बाजारात आज सोन्याला मागणी नव्हती, याशिवाय गेल्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था अपेक्षपेक्षा चांगल्या गतीने वधारली आहे. त्यामुळे व्याजदर वाढविण्याचा फेडरल रिझर्व्हचा निर्णय योग्य असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम सोन्यावर झाला. जागतिक स्तरावर न्यूयॉर्क येथे सोने ०.५५ टक्क्यांनी घसरून १,०७२.३० अमेरिकी डॉलर प्रति औंस झाले. याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने सोन्याची आयातही स्वस्त झाली. त्याचा परिणाम सोन्यावर झाला.
चांदीचा भाव स्थिर राहिल्याने नाण्याचे भावही स्थिर राहिले. १०० नाण्याच्या खरेदीचा दर ४८ हजार रुपये, तर विक्रीचा दर ४९ हजार रुपये राहिला.

Web Title: Gold down by Rs 140 Silver is stable only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.