नवी दिल्ली : बाजारपेठेतील घटणारी मागणी आणि विदेशातही झालेली घट या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली. येथे प्रति तोळा दर आज २६,००० रुपयांपेक्षाही कमी होऊन ते २५,९५० इतके होते.
चांदीचे भाव शुक्रवारी ५०० रुपयांनी घसरून ३४,४०० रुपये प्रति किलो एवढे झाले. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा हा पाच वर्षांतील नीचांक आहे. दिवाळीच्या सणातील खरेदी जवळपास संपली आहे. त्याचा काहीसा फटका बाजारपेठेला बसला आहे. सिंगापूरमध्ये सोने ०.४ टक्क्यांच्या घसरणीसह १०८०.४० प्रति औंसवर स्थिर झाले. नवी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याची किंमत ३०० रुपयांच्या घसरणीसह २५,९५० रुपये आणि २५,८०० रुपये प्रति दहा ग्रॅम होती. ११ आॅगस्टला अशीच परिस्थिती होती. चांदीच्या दरात ५०० रुपयांची घट होऊन आजची किंमत ३४,४०० रुपये प्रति किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीची किंमत ३४५ रुपयांच्या घसरणीसह ३३,९२५ रुपये प्रति किलो होती. चांदीच्या शिक्क्यांची किंमत १००० रुपयांच्या घसरणीसह खरेदी किंमत ४७,००० रुपये, तर विक्री किंमत ४८,००० रुपये प्रति शेकडा होती.
सोने-चांदीवरील आयात शुुल्कात झाली घट
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोने आणि चांदीचे आयात शुल्क कमी केले आहे. सोन्याचे आयात शुल्क कमी करून ३५४ डॉलर (प्रति दहा ग्रॅम) आणि चांदीचे आयात शुल्क ४७० डॉलर (प्रति किलो) केले आहे.
मागच्या आठवड्यात सोन्याचे शुल्क ३७३ डॉलर आणि चांदीचे शुुल्क ५१७ डॉलर होते. दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन यात फेरबदल केला जातो. आयात शुल्कातील बदल करण्यात आल्याची अधिसूचना केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाने जारी केली आहे.
सोन्याचे आयात कमी करण्यासाठी सरकारने करामध्ये वाढ केली होती. आता ती कमी करण्यात आली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
जागतिक बाजारातील मंदीने सोने घसरले !
बाजारपेठेतील घटणारी मागणी आणि विदेशातही झालेली घट या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली. येथे प्रति तोळा दर आज २६,००० रुपयांपेक्षाही कमी होऊन ते २५,९५० इतके होते.
By admin | Updated: November 14, 2015 01:38 IST2015-11-14T01:38:11+5:302015-11-14T01:38:11+5:30
बाजारपेठेतील घटणारी मागणी आणि विदेशातही झालेली घट या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण झाली. येथे प्रति तोळा दर आज २६,००० रुपयांपेक्षाही कमी होऊन ते २५,९५० इतके होते.
