नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा मारा कायम राहिल्याने आठवड्याच्या आरंभी सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून २८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारात घसरणीचा कल असतानाही राजधानी दिल्लीच्या बाजारात सराफा व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याने ही तेजी नोंदली गेली आहे. तथापि, चांदीचा भाव ३५० रुपयांनी कोसळून ३८,००० रुपये प्रतिकिलो राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, आभूषण निर्माते व रिटेलर्स यांनी लग्नसराईच्या काळातली मागणी पूर्ण करण्यासाठी जोरदार खरेदी केली. मात्र, जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर यात मर्यादित वाढ नोंदली गेली आहे.
सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घटून १,२८०.५८ डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भावही ०.५ टक्क्यांच्या घसरणीसह १७.१६ डॉलर प्रतिऔंस राहिला. दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १०० रुपयांनी वधारून अनुक्रमे २८,४५० रुपये व २८,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. यात गेल्या सत्रात २५० रुपयांची वाढ झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,००० रुपयांवर कायम राहिला.
तिकडे तयार चांदीचा भाव ३५० रुपयांनी कोसळून ३८,००० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही १८५ रुपयांच्या घसरणीसह ३७,९५० रुपये प्रतिकिलोवर आला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ६३,००० रुपये व विक्रीसाठी ६४,००० रुपये प्रतिशेकडा राहिला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा तोरा कायम, चांदी मात्र नरमली
सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा मारा कायम राहिल्याने आठवड्याच्या आरंभी सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून २८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
By admin | Updated: February 3, 2015 01:26 IST2015-02-03T01:26:57+5:302015-02-03T01:26:57+5:30
सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा मारा कायम राहिल्याने आठवड्याच्या आरंभी सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढून २८,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
