Lokmat Money > बिझनेस न्यूज > दागिने निर्मात्यांच्या खरेदीने सोने वाढले

दागिने निर्मात्यांच्या खरेदीने सोने वाढले

दागिने निर्मात्यांकडून वाढलेली खरेदी तसेच जागतिक बाजारातील तेजी यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा लाभ मिळाल्याने सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी आणखी वाढ झाली.

By admin | Updated: June 9, 2015 23:24 IST2015-06-09T23:24:11+5:302015-06-09T23:24:11+5:30

दागिने निर्मात्यांकडून वाढलेली खरेदी तसेच जागतिक बाजारातील तेजी यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा लाभ मिळाल्याने सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी आणखी वाढ झाली.

Gold by buying jewelry manufacturers increased | दागिने निर्मात्यांच्या खरेदीने सोने वाढले

दागिने निर्मात्यांच्या खरेदीने सोने वाढले

नवी दिल्ली : दागिने निर्मात्यांकडून वाढलेली खरेदी तसेच जागतिक बाजारातील तेजी यामुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा लाभ मिळाल्याने सोन्या-चांदीच्या भावात मंगळवारी आणखी वाढ झाली. सोने २0 रुपयांनी वाढून २७,0५0 रुपये तोळा झाले. चांदीचा भाव मात्र २00 रुपयांनी घसरून ३७,३00 रुपये किलो झाला.
सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.३ टक्क्यांनी वाढून १,१७७.६८ डॉलर प्रति औंस झाला. अन्य जागतिक बाजारांतही हाच कल दिसून आला. त्याचा परिणाम स्थानिक बाजारांवर झाला, असे सराफा बाजारातील सूत्रांनी सांगितले.
तयार चांदीच्या भावात मात्र २00 रुपयांनी घसरून ३७,३00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी १८५ रुपयांनी घसरून ३६,९४0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ५४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५५ हजार रुपये शेकडा असा कायम राहिला.
शेअर बाजारांत सध्या मंदीचा कल सुरू असल्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सराफा बाजाराकडे वळविला आहे. त्यामुळे बाजारात तेजी दिसून येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

> राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा ९९.९ टक्के तसेच ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,0५0 रुपये आणि २६,९00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला.
> काल सोन्याच्या भावात ८0 रुपयांची वाढ झाली होती. ८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव मात्र २00 रुपयांनी घसरून २३,४00 रुपये झाला.
> खरेदीच्या अभावाचा फटका गिन्नीला बसला, असे व्यावसायिकांनी सांगितले.

Web Title: Gold by buying jewelry manufacturers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.