Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने २७ हजारांच्या खाली

सोने २७ हजारांच्या खाली

जागतिक पातळीवरील नरमाईचा कल आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने २७ हजारांच्या खाली आले. ३८0 रुपयांच्या घसरणीनंतर सोन्याचा

By admin | Updated: August 28, 2015 03:23 IST2015-08-28T03:23:55+5:302015-08-28T03:23:55+5:30

जागतिक पातळीवरील नरमाईचा कल आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने २७ हजारांच्या खाली आले. ३८0 रुपयांच्या घसरणीनंतर सोन्याचा

Gold below 27 thousand | सोने २७ हजारांच्या खाली

सोने २७ हजारांच्या खाली

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील नरमाईचा कल आणि ज्वेलरांनी कमी केलेली खरेदी यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीत सोने २७ हजारांच्या खाली आले. ३८0 रुपयांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव २६,६५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदीही ७७0 रुपयांनी घसरून ३४,२00 रुपये किलो झाली.
औद्योगिक क्षेत्राकडून तसेच शिक्के निर्मात्यांकडून खरेदी कमी झाल्याचा फटका चांदीला बसला. सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, ज्वेलर आणि रिटेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचा फटका सोन्याला बसला. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे त्यांनी हात आखडता घेतला.
जगातील सर्व मोठ्या बाजारात सोने-चांदी घसरत आहे. जागतिक भावाची पातळी ठरविणाऱ्या न्यूयॉर्क येथील बाजारात सोने १.३२ टक्क्यांनी घसरून १,१२५.४0 डॉलर प्रति औंस झाले. त्याच वेळी चांदी ३.९८ टक्क्यांनी घसरून १४.११ डॉलर प्रति औंस झाली.
सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव ७७0 रुपयांनी उतरून ३४,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ९५५ रुपयांनी उतरून ३३,५१५ रुपये किलो झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ५0 हजार रुपये आणि विक्रीसाठी ५१ हजार रुपये प्रति शेकडा असा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold below 27 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.