नवी दिल्ली : परदेशात कमजोर कल असतानाही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहकांच्या मागणीमुळे सोमवारी सोन्याचा भाव ४० रुपयांच्या तेजीसह २७,०७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांच्या मागणीचा जोर वाढल्याने चांदीचा भाव ९० रुपयांनी वधारून ३८,२९० रुपये प्रतिकिलोवर गेला.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहक यांच्या मागणीने सोने-चांदीच्या भावात तेजी नोंदली गेली आहे. तथापि, विदेशी बाजारात मर्यादित व्यवहारामुळे घसरणीचा कल राहिला. दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ४० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,०७० व २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,१०० रुपयांवर कायम राहिला.
सणासुदीचा काळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने उतरले असतानाही भारतीय बाजारात मात्र तेजीचे वातावरण आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
व्यापा-यांच्या मागणीने सोने-चांदी मजबूत
परदेशात कमजोर कल असतानाही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहकांच्या मागणीमुळे सोमवारी सोन्याचा भाव ४० रुपयांच्या तेजीसह २७,०७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला
By admin | Updated: October 7, 2014 02:41 IST2014-10-07T02:41:26+5:302014-10-07T02:41:26+5:30
परदेशात कमजोर कल असतानाही राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आभूषण निर्माते व किरकोळ ग्राहकांच्या मागणीमुळे सोमवारी सोन्याचा भाव ४० रुपयांच्या तेजीसह २७,०७० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला
