नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 9क् रुपयांनी कमी होऊन 26,36क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा भावही औद्योगिक संस्था व नाणोनिर्मात्यांकडून खरेदीचे बळ न मिळाल्याने 1क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 35,4क्क् रुपये प्रतिकिलोवर राहिला.
बाजारातील जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर व्यापारी व किरकोळ विक्रेते यांच्या मागणीत घट झाली. भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत झाला. परिणामी गुंतवणूकदारांना समभाग बाजाराला पसंती दिली. याचा बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
सिंगापुरात सोन्याचा भाव क्.5 टक्क्यांनी घटून 1,16.72 डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भाव क्.2 टक्क्यांनी घसरून 15.65 डॉलर प्रतिऔंस झाला.
तयार चांदीचा भाव 1क्क् रुपयांनी घटून 35,4क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही 165 रुपयांनी कमी होऊन 34,765 रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 58,क्क्क् रुपये व विक्रीकरिता 59,क्क्क् रुपये प्रतिशेकडय़ांवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4दिल्लीत 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 9क् रुपयांनी स्वस्त होऊन अनुक्रमे 26,36क् रुपये व 26,16क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 23,7क्क् रुपयांवर कायम राहिला.