Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदी आणखी घसरले

सोने-चांदी आणखी घसरले

येथील सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव शुक्रवारी आणखी घसरला.

By admin | Updated: September 10, 2016 05:39 IST2016-09-10T05:39:58+5:302016-09-10T05:39:58+5:30

येथील सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव शुक्रवारी आणखी घसरला.

Gold and silver slid further | सोने-चांदी आणखी घसरले

सोने-चांदी आणखी घसरले


नवी दिल्ली : येथील सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव शुक्रवारी आणखी घसरला. सोने १५0 रुपयांनी घसरून ३१,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम, तर चांदी ८५0 रुपयांनी घसरून ४६,१५0 रुपये किलो झाली.
सिंगापूर येथील बाजारात सोने 0.२0 टक्क्यांनी घसरून १,३३५.५0 डॉलर प्रति औंस, तर चांदी 0.६४ टक्के घसरून १९.४५ डॉलर प्रति औंस झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३१,१५0 रुपये आणि ३१ हजार रुपये प्र्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने २५0 रुपयांनी उतरले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,४00 रुपयांवर स्थिर राहिला.
दिल्लीत तयार चांदीचा भाव ८५0 रुपयांनी घसरून ४६,१५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ७७५ रुपयांनी घसरून ४६,५४0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७६ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७७ हजार
रुपये प्रति शेकडा असा स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold and silver slid further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.