नवी दिल्ली : जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण आणि लगAसराईमुळे राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोने आणि चांदीचे भाव वधारले. दाग-दागिने तयार करणा:यांकडून तसेच किरकोळ व्यापा:यांकडून मागणीचा जोर वाढला.
लग्नसराईसोबत जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, किरकोळ व्यापा:यांनी केलेले खरेदी आणि औद्योगिक क्षेत्र तसेच नाणो तयार करणा:या कंपन्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे सोने आणि चांदीचे भाव वधारले. भारतीय सराफा बाजाराची दिशा निश्चित करणा:या न्यूयॉर्कच्या बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 3 टक्क्यांनी वधारत प्रति औंस 1,163 डॉलरवर होता.
4दिल्ली सराफा बाजारात बुधवारी 99.9 आणि 99.5 सोन्याचा भाव 4क्क् रुपयांनी वाढत अनुक्रमे 26,45क् आणि 26,25क् (प्रति दहा ग्रॅम) रुपयांवर बंद झाला.
4चांदीचा भाव 35क् रुपयांनी वाढत प्रति किलो ग्रॅम 35,5क्क् रुपयांवर गेला.