Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन सत्रांच्या घसरणीनंतर सोने-चांदी पुन्हा तेजीत

तीन सत्रांच्या घसरणीनंतर सोने-चांदी पुन्हा तेजीत

तीन सत्रांतील घसरणीला ब्रेक लावताना सोन्या-चांदीचा भाव सोमवारी वाढला. सोने ८0 रुपयांनी वाढून २७,0३0 रुपये तोळा झाले. चांदी १५0 रुपयांनी वाढून ३७,५00 रुपये किलो झाली.

By admin | Updated: June 8, 2015 23:52 IST2015-06-08T23:52:46+5:302015-06-08T23:52:46+5:30

तीन सत्रांतील घसरणीला ब्रेक लावताना सोन्या-चांदीचा भाव सोमवारी वाढला. सोने ८0 रुपयांनी वाढून २७,0३0 रुपये तोळा झाले. चांदी १५0 रुपयांनी वाढून ३७,५00 रुपये किलो झाली.

Gold and silver recover after three sessions of losses | तीन सत्रांच्या घसरणीनंतर सोने-चांदी पुन्हा तेजीत

तीन सत्रांच्या घसरणीनंतर सोने-चांदी पुन्हा तेजीत

नवी दिल्ली : तीन सत्रांतील घसरणीला ब्रेक लावताना सोन्या-चांदीचा भाव सोमवारी वाढला. सोने ८0 रुपयांनी वाढून २७,0३0 रुपये तोळा झाले. चांदी १५0 रुपयांनी वाढून ३७,५00 रुपये किलो झाली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांनी खरेदी वाढविल्यामुळे सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली. त्याचप्रमाणे जागतिक बाजारातील कल आणि डॉलरची स्थिरता याही गोष्टी बाजारासाठी उपकारक ठरल्या.
सिंगापूर बाजारात सोने 0.१ टक्क्यांनी वाढून १,१७३.२४ डॉलर प्रति औंस झाले. चांदीचा भावही 0.१ टक्क्यांनी वाढून १६.११ डॉलर प्रति औंस झाला.
तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढून ३७,५00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ११५ रुपयांनी वाढून ३७,१२५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५४ हजार आणि विक्रीसाठी ५५ हजार शेकडा असा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

सोन्याचे नाणे स्थिर
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ८0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,0३0 रुपये आणि २६,८८0 रुपये प्रति तोळा झाला. तत्पूर्वी गेल्या तीन सत्रांत सोन्याचा भाव ३९0 रुपयांनी घसरला होता. ८ ग्रॅम सोन्याच्या गिन्नीचा भाव २३,६00 रुपयांवर कायम राहिला. विस्कळीत सौद्यांमुळे गिन्नी वाढू शकली नाही.

Web Title: Gold and silver recover after three sessions of losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.