नवी दिल्ली : ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी बाजारातील खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे मागणीत मोठी घट होऊन सोन्या-चांदीचे भाव उतरले. सोने ४0 रुपयांनी उतरून २७,११0 रुपये तोळा, तर चांदी ८00 रुपयांनी उतरून ३७,000 रुपये किलो झाली.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, मागणीतील घसरणीबरोबर जागतिक बाजारातील घसरणही भाव उतरण्यास कारणीभूत झाली. लंडनच्या सोन्या-चांदीच्या बाजारात सोन्याचा भाव 0.२४ टक्क्यांनी उतरून १,१८२.८0 डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.७२ टक्क्यांनी उतरून १५.८९ डॉलर प्रति औंस झाला.
तयार चांदीचा भाव ८00 रुपयांनी उतरून ३७,000 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २७0 रुपयांनी उतरून ३६,६२५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५५ हजार रुपये शेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीचा भाव घसरला
ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी बाजारातील खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे मागणीत मोठी घट होऊन सोन्या-चांदीचे भाव उतरले.
By admin | Updated: June 12, 2015 10:14 IST2015-06-12T00:23:30+5:302015-06-12T10:14:48+5:30
ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांनी बाजारातील खरेदीत हात आखडता घेतल्यामुळे मागणीत मोठी घट होऊन सोन्या-चांदीचे भाव उतरले.
