नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. सोने ९0 रुपयांनी वाढून २५,४९0 रुपये प्रति तोळा झाले. चांदी १५0 रुपयांनी वाढून ३४,२00 रुपये किलो झाली.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरल्याने सोन्याचा भाव वाढण्यास मदत झाली. चांदीला औद्योगिक क्षेत्रातील, तसेच नाणे निर्मात्यांच्या मागणीचा पाठिंबा मिळाला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, अलीकडच्या काळात सोन्यात झालेली घसरण घाईतील व्यवहार असल्याची धारणा गुंतवणूकदारांत झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदी वाढली आहे.
सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.५ टक्क्यांनी वाढून १,१0४.६६ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.२ टक्क्यांनी वाढून १४.७0 डॉलर प्रति औंस झाला. गेल्या आठवड्यात सोने मोठ्या प्रमाणात घसरून फेब्रुवारी २0१0 च्या पातळीवर गेले होते.
तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढून ३४,२00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १८५ रुपयांनी वाढून ३३,८८५ रुपये किलो झाला.
चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ५0 हजार रुपये आणि विक्रीसाठी ५१ हजार रुपये प्रति शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्या-चांदीचा भाव तेजीत
जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. सोने ९0 रुपयांनी वाढून २५,४९0 रुपये प्रति तोळा झाले.
By admin | Updated: July 28, 2015 04:06 IST2015-07-28T04:06:26+5:302015-07-28T04:06:26+5:30
जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. सोने ९0 रुपयांनी वाढून २५,४९0 रुपये प्रति तोळा झाले.
