नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील भाववाढ तसेच स्थानिक पातळीवर दागिने निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली. सोने ३१५ रुपयांनी वाढून २७,५६५ रुपये तोळा झाले. त्याचप्रमाणे चांदी ७00 रुपयांनी वाढून ३८,५00 रुपये किलो झाली.
बाजारातील सूत्रांनी सांगितले की, औद्योगिक संस्था आणि नाणेनिर्माते यांनी बाजारात खरेदी केल्यामुळे चांदीची भाववाढ झाली. जागतिक बाजारात तेजीचे वातावरण आहे. डॉलरची किंमत घसरली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. शिवाय लग्नसराईची मागणी पूर्ण करण्यासाठी दागिने निर्मात्यांनी जोरदार खरेदी केली. या सर्वांचा परिणाम होऊन सराफा बाजारात तेजी आली आहे.
भारतातील किमती ठरविणाऱ्या सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव वाढून १,१९४.0४ डॉलर प्रतिऔंस झाला. मंगळवारी तो १,१९३.९४ डॉलर होता. चांदीचा भाव 0.३ टक्क्यांनी वाढून १६.५९ डॉलर प्रतिऔंस झाला. या भाववाढीचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारातील तेजीच्या रूपाने दिसून आला. तयार चांदीचा भाव ७00 रुपयांनी वाढून ३८,५00 रुपये किलो झाला.
साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ६२५ रुपयांनी वाढून ३८,२६५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव एक हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ५७ हजार आणि विक्रीसाठी ५८ हजार रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दागिने निर्मात्यांच्या खरेदीमुळे सोन्या-चांदीचा भाव वाढला
जागतिक पातळीवरील भाववाढ तसेच स्थानिक पातळीवर दागिने निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात
By admin | Updated: May 14, 2015 00:30 IST2015-05-14T00:30:35+5:302015-05-14T00:30:35+5:30
जागतिक पातळीवरील भाववाढ तसेच स्थानिक पातळीवर दागिने निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात
